‘आदर्श’ नेते येणार अडचणीत ?

March 24, 2012 9:19 AM0 commentsViews: 3

24 मार्च

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात आता मोठे मासेही अडचणीत यायला सुरुवात झाली आहे. जमिनीची मालकी आणि आरक्षण वगळता इतर परवानग्यांच्या बाबतीत स्पष्टिकरणासाठी माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांना साक्षीसाठी न्यायालयीन आयोगासमोर हजर राहावं लागणार अशी माहिती सूत्रांनी आबीएन-लोकमतला दिली. त्यामुळे अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि शिवाजीराव निलंगेकर अडचणीत येणार आहेत. विधिमंडळ आणि संसदेचं अधिवेश झाल्यानंतर या साक्षी होणार आहेत. दरम्यान, आदर्शचा भूखंड कोणाच्या मालकीचा आणि त्यावर कुठलं आरक्षण होतं का, या दोन मुद्द्यांवर स्पष्टीकरण देणारा अंतरीम अहवाल आयोगाकडून लवकरच राज्य सरकारला सादर करणार आहे. चालू अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात म्हणजेच एप्रिल मध्यात सादर होण्याची शक्यता आहे.

close