मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव बंडाच्या पवित्र्यात ?

March 23, 2012 10:29 AM0 commentsViews: 12

23 मार्च

मनसेचे औरंगाबाद जिल्हयातील आमदार हर्षवर्धन जाधव सध्या बंडाच्या पवित्र्यात आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मनसेनी आघाडीला पाठिंबा दिल्यानं हर्षवर्धन जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जानेवारी 2011 मध्ये हर्षवर्धन जाधव यांना मारहाण झाली होती. यावेळी शिवसेना-भाजपने जाधव यांची पाठराखण केली होती. तर खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सभा घेऊन आघाडीवर हल्लाबोल केला होता. मात्र आघाडी सरकारने आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे आघाडीला पाठिंबा देऊ नये अशी त्यांची भुमिका होती मात्र मनसेच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय त्यांच्या जिव्हारी लागला आहे.पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेनं आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे जाधव यांनी सपेशल नाराजी व्यक्त केली.

close