पाकिस्तान पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर करणार नाही – झरदारी

November 22, 2008 6:22 PM0 commentsViews: 3

22 नोव्हेंबर पाकिस्तान कुठल्याही परिस्थितीत अणुबॉम्बचा वापर पहिल्यांदा करणार नाही, असं आश्वासन पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी दिलं आहे. व्हीसाशिवाय दोन्ही देशातल्या नागरिकांना ये-जा करता यावी यासाठी त्यांनी ई कार्ड देण्याचा प्रस्ताव मांडला ते दिल्लीत आयोजित हिंदुस्तान टाईम्स आणि सीएनएन आयबीएन लीडरशिप समिटमध्ये बोलत होते. भारत आणि पाकिस्तानकडे सारखीच अण्वस्त्र आहेत. पण कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तान पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर करणार नाही, असं आश्वासन पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी दिलं आहे. यापूर्वी भारताचीही हीच भूमिका होती. पाकिस्तानमधले अनेकजण बॉलीवूडच्या चित्रपटांचे, कलाकारांचे फॅन आहेत. माधुरी दीक्षित ही आपली आवडती अभिनेत्री असल्याचं झरदारी यावेळी म्हणाले.असिफ अली झरदारी पाकिस्तानचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांची भारताबद्दलची भूमिका थोडीशी सकारात्मक आहे.

close