मुंबईजवळ जहाजात स्फोट ; 3 जण जखमी

March 24, 2012 3:17 PM0 commentsViews: 2

24 मार्च

मुंबई जवळच्या बुचर आयलँड याठिकाणी एका जहाजातल्या केमिकलचा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे 3 कर्मचारी जखमी झालेत. रॉयल डायमंड सेव्हन असं या जहाजाचं नाव आहे. सर्व जखमींना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या बोटीवर ज्वलनशील केमिकल असल्यामुळे तिला मुंबईच्या किनार्‍यापासून काही अंतरावर असलेल्या बुचर आयलँड जवळ नांगर टाकू न उभं करण्यात आलं होतं. सध्या या जहाजावर कोणीही नाही. पण जहाजावरील केमिकलमुळे आणखी दुर्घटना घडू नये म्हणून नेव्ही आणि बीपीटीने ताबा घेतला आहे.

close