माजी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचं निधन

March 23, 2012 10:53 AM0 commentsViews: 3

23 मार्च

राज्याच्या माजी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचं काल मुंबईतल्या हिंदुजा हॉस्पिटल मध्ये निधन झालं. त्यांना गेल्या चार वर्षांपासून कॅन्सरने ग्रासले होते. बीड जिल्ह्यातील केज या विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा त्यांनी आमदार म्हणून प्रतीनिधित्व केलं आहे. तसेच आरोग्यमंत्री म्हणूनही चार वर्ष त्यांनी काम पाहिलंय. विमल मुंदडा यांच्यावर उद्या अंबाजोगाई इथे सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

close