दिवेआगरमध्ये सुवर्ण गणेशमूर्तीची चोरी ; वॉचमनचा मृत्यू

March 24, 2012 9:40 AM0 commentsViews: 50

24 मार्च

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर इथल्या सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा पडला. अज्ञात दरोडाखोरांनी मध्यरात्री मंदिरावर दरोडा घालून मंदिरातील दीड किलो वजनाची सोन्याची गणेश मूर्ती आणि इतर दागिने पळविले. दरोडेखोरांनी मंदिराच्या 2 वॉचमनला बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका वॉचमनचा मृत्यू झाला आहे. महादेव सखाराम गडसे असं या वॉचमनचं नाव आहे. दरोडेखोरांनी डोक्यावर लोखंडी सळईने मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

द्रौपदीबाई पाटील यांच्या मालकीच्या जागेत खोदकाम करताना 17 ऑक्टोबर 1997 रोजी दीड किलो वजनाची ही सुवर्ण गणेश मूर्ती आणि इतर सोन्याचे दागिने सापडले होते. त्यानंतर या सुवर्ण गणेशाची मंदिरात स्थापना करण्यात आली होती. दिवेआगरच्या समुद्रकिनारी वसलेल्या या सुवर्ण गणेश मंदिरास दररोज हजारो पर्यटक भेट देतात. मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी पहारेकर्‍यांना मारहाण करून गणेश मूर्ती आणि दागिने पळविल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली.

close