नवी मुंबईतील रिक्षाचालकांचा संप मागे

March 23, 2012 2:00 PM0 commentsViews: 3

23 मार्च

गेली चार दिवस नवीमुंबईकरांना वेठीस धरुन रिक्षाचालकांनी पुकारलेला बेमुदत संप अखेर मागे घेतला आहे. आरटीओच्या मध्यस्थीनंतर रिक्षा युनियनने अखेर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. रिक्षांच्या भाडेकपातीच्या निर्णयाविरोधात गेल्या चार दिवसांपासून नवी मुंबईत रिक्षा बंद होत्या. पण आरटीओच्या अधिकार्‍यांनी रिक्षा युनियनची समजूत काढली आणि आता भाडेकपातीचा निर्णय मान्य असल्याचं युनियनचं म्हणणं आहे. पण युनियनच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन आरटीओच्या पदाधिकार्‍यांनी दिल्यानंतर युनियनने संप मागे घेतला आहे.

रिक्षाचालकांच्या या संपामुळे नवीमुंबईकरांचे हाल झाले. या संपाच्या विरोधाता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्याकर्त्यांनी आंदोलन केले होते. संप मागे घ्यावी अशी विनंतीही करण्यात आली होती. एव्हान एवढच नाही तर खुद्द कार्यकर्त्यांनी आपल्या वाहनातून प्रवाश्यांना सोडले होते. चार दिवस रिक्षाचालकांनी भाडेकपातीच्या विरोधात आंदोलन केले आणि भाडेकपात मान्य आहे म्हणून संप मागे घेतला. नेमके या संपातून युनियनला काय सिध्द करायचे होते असा सवाल नागरिक विचारत आहे.

close