मालाडमध्ये तरुणीची चाकू भोसकून हत्या

March 24, 2012 11:20 AM0 commentsViews: 6

24 मार्च

मालाडमध्ये काल सीमा परब या तरुणीची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. कोकणीपाड्यात राहणारी सीमा परब ही तरूणी आपल्या कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली असतानाच अचानक एका युवकाने येऊन चाकूने तीला भोसकले त्यातच तिचा मृत्यू झाला. सीमाची हत्या एकतर्फी प्रेमातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी पोलीस करीत आहेत.

close