मुरली मनोहर जोशी ‘टू जी’तील आरोपींना भेटले – मिश्रा

March 24, 2012 12:04 PM0 commentsViews: 4

24 मार्च

राज्यसभा उमेदवारी मिळुन ती मागे घेण्यात आल्यानंतर भाजप उमेदवार अंशुमन मिश्रा यांनी आता भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. लोकलेखा समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी टू जी घोटाळ्यात आरोपी असलेल्या उद्योजकांची भेट घेतल्याचा आरोप त्यांनी केला. 2 जी प्रकरणी ही लोकलेखा समिती स्थापन करण्यात आली होती. एवढंच नाही तर आपण भाजपशी दशकभराहून जास्त काळ संपर्कात आहोत. मुरली मनोहर जोशींसह अनेक भाजप नेत्यांना निवडणुकी दरम्यान आपण निधी उभारुन दिलाय असंही त्यांनी म्हटलं आहे. आयबीएन नेटवर्कच्या एका कार्यक्रमात मिश्रा यांनी हे आरोप केले.

close