हाऊसिंग प्रोजेक्टवर 18 टक्के सूट

November 22, 2008 5:34 PM0 commentsViews: 6

22 नोव्हेंबरसामान्यांचं स्वस्त घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता बिल्डर्सनीही मदत करण्याचं मान्य केलं आहे. दिल्लीतल्या डिएलएफ, ओमेक्स, अन्सल एपीआय सारख्या मोठ्या डेव्हलपर्सनी घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. वीस लाखापर्यंतच्या हाऊसिंग प्रोजेक्टवर 18 टक्के सूट देणार असल्यांचं डिएलएफनं मान्य केलं आहे. नारडेको या बिल्डर असोसिएशच्या पत्रकार परिषदेत ही घोषणा कऱण्यात आली. या असोसिएशनमध्ये अंदाजे 500 रिअल इस्टेट बिल्डरांचा समावेश आहे.नव्या प्रोजेक्टवर वेळेवर हफ्ता भरणा-या ग्राहकांना पाच टक्के सूट देण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. कमी झालेल्या या किमती उद्यापासूनचं लागू केल्या जाणार आहे. मात्र पंजाबमधल्या बिल्डर्स असोसिएशनं नारडेकोच्या निर्णयाला विरोध केला आहे.

close