‘डर्टी पिक्चर’ पाहणार्‍या 2 आमदारांना क्लिन चीट

March 23, 2012 12:52 PM0 commentsViews: 6

23 मार्च

गुजरात विधानसभेत सभागृहाचं कामकाज सुरू असतानाच भाजपचे आमदार शंकर चौधरी आणि जेठा धारवाड आपल्या आय-पॅडवर अश्लील व्हिडिओ पाहत असताना कॅमेर्‍यात कैद झाले. पण आज भाजपला या प्रकरणी अखेर दिलासा मिळाला आहे. फॉरेन्सिक लॅबने या दोन आमदारांना क्लिन चीट दिली आहे. गाधीनगरमधल्या फॉरेन्सिक लॅबमध्ये आमदार शंकर चौधरी यांच्या आयपॅडची चाचणी करण्यात आल्यानंतर त्यात 'तसलं' काही आढळले नाही त्यामुळे त्यांना क्लीन चीट देण्यात आली.

काही दिवसांपुर्वी कर्नाटकमध्ये भाजपच्या दोन आमदार मोबाईलवर पोर्न व्हिडिओ पाहत असताना उघड झाले होते. हे प्रकरण ताजे असतानाच नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये भाजपचे 2 आमदार विधानसभेतच अश्लील व्हिडिओ पाहताना पकडले गेले. सभागृहाचं कामकाज सुरू असतानाच भाजपचे आमदार शंकर चौधरी आणि जेठा धारवाड आपल्या आय-पॅडवर अश्लील व्हिडिओ पाहत होते. त्यांचं हे कृत्य एका पत्रकाराने आपल्या मोबाईल कॅमेर्‍यावर शूट केल्याचा दावा केला. याचीच दखल घेत या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करावी अशी मागणी करत काँग्रेसच्या आमदारांनी गदारोळ घातला. अशाच प्रकरणी शितोंडे उडाले असल्यामुळे सरकारने या घटनेच्या संसदीय चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच आयपॅड फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवण्यात आला. आज फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला. त्यांच्या आयपॅडमध्ये 'तसलं' काही नव्हते असा खुलासा केला. लॅबच्या यारिपोर्टमुळे दोन्ही आमदारांचा जीव भांड्यात पडला. लॅबने या दोन्ही आमदारांनी क्लिन चीट दिली.

close