ओरिसामध्ये नक्षलवाद्यांनी केलं आमदाराचं अपहरण

March 24, 2012 12:16 PM0 commentsViews: 1

24 मार्च

ओरिसातील बी.जे.डी आमदार झिंना हिकाका यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं आहे. घरी परतत असताना हिकाका यांचं अपहरण करण्यात आलं आहे. मात्र त्यांचा ड्रायव्हर आणि सुरक्षा अधिकार्‍याला सोडून देण्यात आले आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या घटनेबद्दल केंद्रीय गृहमंत्री पी.चिंदबरम यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने नक्षलवाद्यांपासून राज्यातल्या नेत्यांना धोका असल्याबद्दल सुचना दोन दिवसांपुर्वीच पाठवली होती. हिकाका यांचं अपहरण झालं त्या ठिकाणापासून माओवाद्यांचं एक पत्रक सापडलंय. या पत्रकवर ऑपरेशन ग्रीन हंट मागे घ्या, असं लिहीलेलं आहे. माओवादी नेता रामकृष्णन आणि दया यांचा हिकाका यांच्या अपहरणामागे हात असल्याचा संशय व्यक्त होतोय.

close