आता घटस्फोट झाला सोपा ; घटस्फोटानंतर पत्नीला संपत्तीत वाटा

March 23, 2012 2:44 PM0 commentsViews: 417

23 मार्च

दोघांच्या संसार सुखाने चाललाय…पण अचानक संसाराची गाडी रुळावरून घसरली….मग रोज वाद…कटकट..भांडण…वेळ अशी आली की आता एकमेकांचे तोंड सुध्दा बघायचे नाही …आता घटस्फोटच हवाय…सुखी संसारला लागलेली नजर दूर करण्यासाठी त्या दोंघाशिवाय कोणीच काही करू शकणार नाही…त्यामुळे दोन वर्षापुर्वी हिंदू विवाह सुधारणा कायदा सादर करण्यात आला आणि आता त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे घटस्फोट आणखी लवकर मिळणार आहे तसेच नवर्‍याच्या संपत्तीचा वाटा मिळणार आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. घटस्फोटासाठी 6 महिन्याची अट आता शिथिल करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जर दोघांचीही इच्छा असेल तर लवकरात लवकर घटस्फोट मिळणं सोपं होणार आहे. याचबरोबर घटस्फोटानंतर पत्नीला संपत्तीत वाटा देण्याचा महत्त्वाचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात सात टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या एकूण भत्त्यात 58 वरुन 65 टक्के वाढ केली आहे. ही वाढ 1 जानेवारी 2012 पासून लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णायमुळे तिजोरीवर वर्षाला 750 कोटींचा अतिरिक्त भार येणार आहे. त्याचबरोबर भोपाळ गॅस पिडितांना 7,500 कोटींची भरपाई मिळणार आहे.तर हिंदू विवाह कायद्यात सुधारणेला मंजुरी देण्यात आली आहे. विवाह कायदा विधेयक दोन वर्षापुर्वी राज्यसभेत सादर केले होते. पण नंतर हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्यात आले होते. केंद्राने सुचवलेल्या सुधारणा समितीने मान्य केल्या आहे. यामुळे घटस्फोट झाल्यानंतर पती-पत्नीला 6 महिने एकत्र राहणे आता जरूरी असणार नाही. कोर्टाने ठरवले तर ही मर्यादा कमी करू शकतो. तसेच घटस्फोटानंतर पत्नीला संपत्तीत वाटा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पण हा वाटा कोर्ट ठरवणार आहे. घटस्फोट झाल्यानंतर जर पुन्हा एकत्र यायचे नसेल तर पत्नीला घटस्फोट घेण्याचा अधिकार असणार आहे. पण पतीकडे असा कोणताच अधिकार नसणार आहे. त्याचबरोबर दत्तक घेतलेल्या मुलाचा संपत्तीवर बरोबरीचा हक्क असणार आहे.

close