पुण्यात आढळली नक्षलवाद्यांची पत्रक

March 23, 2012 4:18 PM0 commentsViews: 3

23 मार्च

नक्षलवाद्यांचे पत्रकं आता पुण्यातही आढळली आहे. 21 ते 23 मार्चदरम्यान महाराष्ट्र, छत्तीसगढ,आंध्रप्रदेश,उडीसा नक्षलवाद्यांनी बंदच आवाहन केलं आहे. त्याची पोस्टर्स पुण्यातल्या नवी पेठ भागातल्या पत्रकार भवनाच्या भींतीवर लावल्यात आल्याचं आढळलंय. अटक करण्यात आलेल्या माओवादी समर्थक कोबाड गांधी, कॉम्रेड एंजला, भानू यांची तातडीनं सुटका करावी, असा मागणी या पत्रकात करण्यात आली आहे. आत्तापर्यंत गडचिरोली, चंद्रपूरसारख्या शहरातच नक्षलवाद्यांच्या कारवाया चालायच्या. पण गेल्या काही महिन्यात मुंबईतल्या डोंबवली, ठाणे, आणि आता पुण्यातही नक्षलवाद्यांचा वावर असल्याचं उघड झालंय.

close