गोदावरीची अवस्था पाहुन महापौरांना धक्का

March 24, 2012 1:15 PM0 commentsViews:

24 मार्च

नाशिकच्या नव्या आयुक्तांनी आणि महापौर यतीन वाघ यांनी गोदावरी नदीचा पाहणी दौरा केला. गटारापेक्षाही वाईट अवस्थेतल्या गोदावरीचे रुप पाहून महापौरांनाही धक्का बसला. संपूर्ण देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जाणारा सिंहस्थ कुंभमेळा येत्या 15 महिन्यांवर आला आहे. आणि त्यासाठी गोदावरी स्वच्छतेपासून मुलभूत सुविधांचं आव्हान नाशिक महापालिकेसमोर आहे. आज मात्र गोदापात्रात सोडलं जाणारं ड्रेनेजचं पाणीही महापालिका रोखू शकलेली नाही. तरी येत्या सहा महिन्यात ही दुरवस्था बदललेली असेल असा विश्वास महापौर आणि आयुक्तांना वाटतोय.

close