मध्यावधी निवडणुका होऊ शकतात – मुलायम सिंग

March 23, 2012 4:55 PM0 commentsViews: 106

23 मार्च

काँग्रेसप्रणित युपीए सरकारसमोरच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यूपीएला बाहेरुन पाठिंबा देणार्‍या मुलायम सिंग यादव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे 2014 च्या आधीच मध्यावधी निवडणूक होतील का, अशी शंका उपस्थित झाली आहे. तृणमुल आणि द्रमुकच्या दबावामुळे केंद्र सरकारला अनेक निर्णय मागे घ्यावे लागले आहेत. तर राष्ट्रवादीच्या शरद पवारांनीही नुकतीच पंतप्रधानांवर नाराजी व्यक्त केली. या सर्व पार्श्वभूमीवर मुलायम सिंग यादव यांनी आज केलेल्या वक्तव्याला महत्त्व आलंय.

close