आघाडीत कुठलाही वाद नाही,पण समन्वय हवा – मुख्यमंत्री

March 25, 2012 9:53 AM0 commentsViews: 2

25 मार्च

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कुठलाही वाद नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज स्पष्ट केलं. मात्र दोन्ही पक्षांमध्ये जास्त प्रमाणात समन्वयाची गरज असून अशा समन्वयासाठी प्रयत्न करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. काल शनिवारी शरद पवारांनी पुण्यात जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसनंच आघाडीचा धर्म पाळला नाही. आघाडीमध्ये शिस्त केवळ राष्ट्रवादी काँग्रेसनं पाळायची का? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला. कोल्हापूर आणि पुण्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसनंच आघाडीचा धर्म पाळला नाही. आम्हाला हा वाद पुढं वाढवायचा नाही, असंही पवार म्हणाले. पण, अशाच गोष्टी पुन्हा घडल्या तर आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही पवारांनी दिला.

close