पुणे-नगर रस्त्यावर ट्रकने 7 जणांना उडवले ; 1 ठार

March 25, 2012 11:34 AM0 commentsViews: 1

25 मार्च

पुणे-अहमदनगर महामार्गावर आज ट्रकने 7 जणांना उडवले या अपघातामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला असून तर 6 जण जखमी झाले आहेत. नगरहून पुण्याकडे निघालेला मालवाहु ट्रक लोणीकंद येथे पोहचला असता अचानक ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रक सुरवातीला फुटपाथला धडकला, नंतर त्यांनं दोन दुकाची स्वारांना उडवलं, शेजरच्या एका दुकानाचंही यात नुकसान झालं. जखमींना पुण्याच्या रक्षक आणि नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

close