राज्य बजेट 2012-13 : काय स्वस्त, काय महाग ?

March 26, 2012 1:11 PM0 commentsViews: 45

26 मार्च

अगोदरच महागाईच्या आगीत होरपाळून निघालेले जनतेल्या आता आणखी चटके बसणार आहे.अलीकडेच देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. यामध्ये एका हाताने देण्यात आले तर दुसर्‍या हाताने घेण्यात आले. आज अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे अर्थसंकल्प 2012-13 सादर केला आहे. महाराष्ट्राला महाराज्य करणार अशी घोषणा अजित पवारांनी केली. मात्र घरघुती गॅसमध्ये 5 टक्काने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे राज्यात विमानप्रवासही महागणार आहे विमानप्रवासावर 5 टक्के कर वाढवण्यात आला आहे. तसेच 'बिडी पिना स्वास्थ के लिए हानिकारक होती है' असं सांगत बिडीवर 12.5 टक्के कर वाढवण्यात आला आहे. तर सुकामेव्यावर 5 टक्काने वाढ करण्यात आली आहे. तर कार खरेदीमध्ये 2 टक्क्याने वाढ केली आहे. काय स्वस्त होणार ?

कापड प्रक्रीया उद्योगावरील करात सवलतजीवनावश्यक वस्तू- सूट कामय हातमाग यंत्रमाग सुतांची परराज्यातून खरेदी सुतावरील कराचा दर 5 टक्यावरुन 2 टक्के कमी परिक्षेसाठी साधनसामुग्रीवर- 12 टक्क्यांवरुन 5 टक्के कमी सीएनजी किट बसवलेल्या मोटारींना 2 टक्के सूट बॅटरीवर चालणा-या वाहनांसाठी 100 टक्के सवलत

काय महाग होणार ?

घरगुती गॅसवर 5 टक्के करव्यवसाय कर नोंदणी शुल्क वाढलंतंबाखू बिडीवर 12.5 टक्के करसुक्या मेव्यावर 5 टक्के करनैसर्गिक वायूवर 12.5 टक्के करसीएनजी दर वाढणारकार आणि जीपवरचा विक्रीकर वाढ

close