महागाईचे रडगाणे पुन्हा सर्वसामान्याच्या दारी !

March 26, 2012 10:58 AM0 commentsViews: 11

26 मार्च

महाराष्ट्राला महाराज्य करण्याचा संकल्प करत अर्थमंत्री अजित पवारांनी 2012 चा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. 2 हजार कोटींच्या महसुली तुटीच्या अर्थसंकल्प काही दिलासा देणार्‍या घोषणा करण्यात आल्यात तर काही सर्वसामान्यांचा खिसा कापणार्‍या घोषणा करण्यात आल्या आहेत. गॅस सिलेंडरवरमध्ये 5 टक्क्याने वाढ केल्यामुळे आता सिलेंडर खरेदी करण्यासाठी 20 ते 25 रुपये शिल्लक मोजावे लागणार आहे. एकीकडे सिएनजीच्या दरात वाढ करणार तर दुसरीकडे सीएनजी किट लावणार्‍या गाड्या स्वस्त करण्यात आल्या आहे.

बीडी, सुक्का मेवा, पेट्रोल-डिझेलवर चालणार्‍या कार महागणार आहे. तर शहरी आणि ग्रामीण पाणीपूरवठा वीजबिलातील थकबाकी कमी करण्यासाठी, थकबाकीवरील 100 टक्के व्याज माफ करण्याचा महावितरणने निर्णय घेतल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसेच वीजनिर्मितीसाठी 1500 कोटी रुपये प्रस्तावित केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तर या बजेटमध्ये सर्वसामान्यावर बोजा टाकला आहे अशी टीका विरोधकांनी केली.

तर वीजनिर्मितीसाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. शहरी आणि ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या विजबिलांची थकबाकी कमी करण्यासाठी थकबाकीवरील शंभर टक्के व्याज माफ करण्याचा निर्णय महावितरणने घेतला. या ग्राहकांनी थकीत वीज बिलाची मुळ रक्कम 12 मासिक हप्त्यात भरायची आहे. कायम स्वरुपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक विजग्राहकांच्या वीज थकबाकीवरील 50 टक्के व्याज सरसकट माफ करण्यात येईल. त्यामुळे बंद पडलेल्या उद्योगांना चालना मिळेल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. अशा बंद उद्योजकांनी वीजबिलाची मुळ रक्कम आणि त्यावरील 20 टक्के तीन महिन्यात भरलेल्यास त्यांचे उर्वरीत 30 टक्के व्याजही माफ करण्यता येईल.

काय स्वस्त होणार ?

कापड प्रक्रीया उद्योगावरील करात सवलतजीवनावश्यक वस्तू- सूट कामय हातमाग यंत्रमाग सुतांची परराज्यातून खरेदी सुतावरील कराचा दर 5 टक्यावरुन 2 टक्के कमी परिक्षेसाठी साधनसामुग्रीवर- 12 टक्क्यांवरुन 5 टक्के कमी सीएनजी किट बसवलेल्या मोटारींना 2 टक्के सूट बॅटरीवर चालणा-या वाहनांसाठी 100 टक्के सवलत

काय महाग होणार ?

घरगुती गॅसवर 5 टक्के करव्यवसाय कर नोंदणी शुल्क वाढलंतंबाखू बिडीवर 12.5 टक्के करसुक्या मेव्यावर 5 टक्के करनैसर्गिक वायूवर 12.5 टक्के करसीएनजी दर वाढणार पेट्रोल कार विक्रीकर 2 टक्के वाढडिझेल कार विक्रीकर 5 टक्के वाढ

महत्त्वाच्या घोषणा

आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरु करणार तातडीनं वैद्यकीय सेवा मिळणाररुग्णालयाच्या मुख्य इमारत, कर्मचारी 270 बांधकाम सुरु- 260 कोटी रुपये राजीव गांधी योजना- 34 कोटी गडचिरोली, धुळ्या सकट 6 जिल्हात कार्डाचं वाटप दुरध्वनीद्वारे आरोग्य योजने- 73 कोटी अलिबाग, मुबंई, सातारा- 100 वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय जेजेसाठी -जे जे रुग्णालय 630 कोटीचा नुतनीकरण आराखडा मंजूर

close