औरंगाबादेत एन्काऊंटरमध्ये सीमीचा दहशतवादी ठार

March 26, 2012 1:10 PM0 commentsViews: 3

26 मार्च

औरंगाबादमध्ये आज एटीएसने केलेल्या एन्काऊंटरमध्ये सिमीचा संशयित अतिरेकी ठार झाला. खलील कुरेशी असं त्याचं नाव आहे. इतर 2 संशयित अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत एक पोलीस कॉन्स्टेबलही जखमी झाला आहे. अहमदाबादमध्ये 2008 साली अतिरेकी हल्ला झाला होता. त्यात औरंगाबादमध्ये अटक झालेल्या अतिरेक्यांचा हात होता, असं सांगितलं जातंय. बाबरी मस्जीद खटल्याची सुनावणी करणार्‍या न्यायाधीशांच्या हत्येच्या कटातही खलीलचा सहभाग होता. औरंगाबादमधल्या हिमायत बाग परिसरात हे एन्काऊंटर झालं. या तीन अतिरेक्यांनी एटीएसच्या टीमवर गोळीबार केला. त्यांच्याकडून पोलिसांनी 4 रिव्हॉल्वर्स जप्त केले आहेत

close