जम्मू-काश्मीरमध्ये 60 टक्के मतदान

November 23, 2008 5:30 AM0 commentsViews: 3

23 नोव्हेंबर, काश्मीरजम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या दुसर्‍या टप्प्यासाठी 60 टक्के मतदान झालं. सहा जागांसाठी 81 उमेदवार रिंगणात आहेत.जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या दुसर्‍या टप्प्याचं मतदान रविवारी होत आहे. सहा जागांसाठी 81 उमेदवार रिंगणात आहेत.भाजप, काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष तर नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल डेमोक्रेटीक पार्टी हे दोन प्रादेशिक पक्ष यांच्यामध्ये या निवडणुकीत प्रामुख्यानं लढत होईल. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला गंदरबालमधून नशीब अजमावतायत. मागच्या निवडणुकीत त्यांना इथून पराभव पत्करावा लागला होता. निवडणुकांना सामोरे जाणार्‍या जवळपास सर्व पक्षांच्या जाहीरनाम्यात अमरनाथ जमीन प्रकरण, दहशतवाद समाप्त करून राजकीय स्थिरता आणणे, विकास, रोजगार, महिला सबलीकरण असे जवळपास सारखेच मुद्दे आहेत. तसंच स्वायत्तता हा मुददाही काही प्रमुख पक्षांच्या अजेंड्यावर आहे. 17 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान 87 मतदारसंघात एकूण सात टप्प्यात हे मतदान पार पडणार आहे.

close