राज्य बजेट 2012-13 : शेतकर्‍यांसाठी मदत

March 26, 2012 11:11 AM0 commentsViews: 40

26 मार्च

महाराष्ट्राचा शेतकरी प्रगत,आधुनिक होणासाठी अजित पवारांनी पाऊल उचलले आहे. आज राज्यात अवेळी पडणार पाऊस, वातावरणात होणारे बदल यामुळे अगोदरच बेजार झालेल्या शेतकर्‍यांना अजित पवारांनी अर्थसंकल्पात पाठबळ दिले आहे. शेतकर्‍यांसाठी वीजेसाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सर्वंकष पीक विमा योजना ही राबवण्यात येणार आहे. याचबरोबर महात्मा गांधी योजनेअंतर्गत तीन हजार शेततळे बांधणार आणि 18 हजार खुल्या विहीरी बांधणार आहे. तर विदर्भातील शेतक-यांसाठी विशेष राज्य योजनेअंतर्गत 214 कोटी रुपये तरतूद केले आहे. सोयबीन,कापूस,धान शेतकर्‍यांसाठी सरकारने या अगोदरच 1 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यात अर्थसंकल्पात शेतकर्‍यांसाठी केलेल्या तरतुदी शेतकर्‍यांना किती फायद्याच्या ठरणार हे पाहावे लागणार आहे.

शेतकर्‍यांसाठी तरतूद

शेतकर्‍यांना वीज दरात सवलतशेतकर्‍यांच्या वीजेसाठी 500कोटींची तरतूदअल्प व्याजदर कर्ज- 138 कोटी रु.कृषीपंपाचा अनुशेष भरुन काढणारखतांच्या साठवणुकीसाठी – 20 कोटीलघु पाटबंधारे प्रकल्पांसाठी तरतूदमहात्मा गांधी योजनेअंतर्गत 3000 शेततळे बांधणार18 हजार खुल्या विहीरी बांधणार विदर्भातील शेतक-यांसाठी विशेष राज्य योजना- 214 कोटीसर्वंकष पीक विमा योजनाकृषी यांत्रिकीकरणसंगणकीय लिलाव पध्दतीचा वापर शेतक-यांसाठी उत्पादन ते पणन व्यवस्था योजना

close