यापुढे बाबा रामदेव -टीम अण्णा एकत्र लढणार – अण्णा

March 25, 2012 1:44 PM0 commentsViews: 1

25 मार्च

जेष्ठ अण्णा हजारे आणि बाबा रामदेव पुन्हा एकदा एकत्र आलेत. अण्णा हजारेंनी आज तशी घोषणा केली. यापुढे टीम अण्णांनी कुठलं आंदोलन केलं किंवा बाबा रामदेव यांनी कुठलं आंदोलन केलं तर एकमेकांना साथ देऊ, असं अण्णांनी सांगितलं आहे. दिल्लीत रामलीला मैदानावर बाबा रामदेव यांचे आंदोलन पोलिसांनी चिरुडून टाकले होते. पोलिसांची ही कारवाई निंदनीय होती ही कारवाई लोकशाहीला कलंक असल्याचं पुन्हा एकदा अण्णांनी म्हटलं. त्यामुळे बाबा रामदेव काळा पैसा भारतात आणण्यासाठी लढा देत आहे त्यांच्या लढ्याला हातभार लाभावा यासाठी टीम अण्णा नेहमी पाठिंबा तर देतच आली यापुढे सहभागी सुध्दा होईल तर त्यांचे समर्थक सुध्दा आपल्या आंदोलनाला साथ देतील असंही अण्णा जाहीर केलं.

close