‘झाडी बोली’त रंगतोय ‘प्रीती संगम’ नाटकाचा प्रयोग

March 25, 2012 8:50 AM0 commentsViews: 13

हरीश मोटघरे, गोंदिया

25 मार्च

चैत्र सुरू झाला की शेतकरी थोडा निवांत होतो. शेतीची कामं संपतात आणि मग गोंदियातल्या 'झाडी बोली' भागातल्या कोहळी समाजाला वेध लागतात ते 'प्रीती संगम' या नाटकाचे.गोंदियात झाडीबोली भागात संध्याकाळी नाटकाचे प्रयोग रंगतात. दिवसभर शेतात राबणार्‍या स्त्रिया संध्याकाळी कलाकारांच्या भूमिकेत शिरतात. विशेष म्हणजे या नाटकात स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही भूमिका महिला कलाकार साकारतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही लोककला सादर केली जाते.'झाडी बोली' भाषेच्या संवर्धनासाठी रचनाताई गहाणे गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहेत. नाटकाच्या माध्यमातून लोकाचं मनोरंजन तर होतंच..पण झाडीबोलीही दूरदूरपर्यंत पोहोचते.

close