‘कराड’चा कार्यक्रम शरद पवारांनी टाळला

March 25, 2012 4:09 PM0 commentsViews: 2

25 मार्च

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कुठलाही वाद नाही, असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. मात्र दोन्ही पक्षांमध्ये जास्त प्रमाणात समन्वयाची गरज असून अशा समन्वयासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आघाडीत वाद नसल्याचा दावा केला असला तरी वाद अजूनही कायम असल्याचं स्पष्ट झालंय. कराडमधील पुर्वनियोजित कार्यक्रमास शरद पवार गैरहजर होते. शरद पवारांनी कार्यक्रमाला अनुपस्थित राहून मुख्यमंत्र्यांची जवळीक टाळली. कराडमध्ये भारताची संरक्षण व परराष्ट्र नीती यशवंतराव चव्हाण यांचे योगदान या परिसंवादांध्ये शरद पवार आणि मुख्यमंत्री उपस्थीत राहणार होते.

close