गोंदियाच्या जंगलामध्ये वणवा भडकला

March 26, 2012 7:50 AM0 commentsViews: 9

26 मार्च

गोंदिया जिल्ह्यातील जंगलामध्ये वणवा भडकला आहे. जिल्हयातील देवरी, सालेकसा, गंगाझरी केळझरा, आणि पागडी परिसरातील जंगलात सगळीकडे हेच चित्र आहे. गेल्या एक महिन्यापासून हा वणवा भडकला. तेंदू पत्ता आणि मोहफूल वेचणार्‍या लोकांनी या आगी लावल्या आहेत. पण आग आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाने अजूनही प्रयत्न सुरु केलेले नाहीत. आता आग नागझिरा राष्ट्रीय अभयारण्याच्या शेजारच्या जंगलात पसरली आहे. आग आटोक्यात आली नाही तर नागझिरा अभयारण्याच्या कोअर भागापर्यंत ही आग पोहचू शकते.

close