एस टी संघटनेच्या अधिवेशनात कर्मचार्‍यांची घोषणाबाजी

March 25, 2012 4:22 PM0 commentsViews: 30

25 मार्च

सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये आयोजित एस टी कामगार संघटनेच्या अधिवेशनात आज कर्मचार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली. एसटी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांचे भाषण सुरु असताना कर्मचार्‍यांनी घोषणा देऊन गोंधळ घालून परिचारक यांचं भाषण बंद पाडलं. परिचारकांनी शिकाऊ कामगारांच्या बाबतीत चुकीचं विधान केल्यानं कामगार चिडले आणि त्यांनी अध्यक्षांनाच भाषण बंद करण्यास भाग पाडलं. थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोरच हा प्रकार घडल्याने कार्यक्रम विस्कटू लागला पण जयंत पाटील यांनी कामगारांना शांत केलं. महामंडळाचे खासगीकरण केलं जाऊ नये अशी कर्मचार्‍यांची मागणी होती. एस. टी. महामंडळाचे खासगीकरण होणार नाही ही सरकारची भूमिका असून लवकरच 19 हजार कर्मचार्‍यांची भरती केली जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी या अधिवेशनात केली. तसेच एस टी महामंडळ नव्या 3, 500 बसेस खरेदी करणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

close