अंशुमन मिश्रांचे आरोप बिनबुडाचे – गडकरी

March 25, 2012 4:33 PM0 commentsViews: 3

25 मार्च

उद्योजक अंशुमन मिश्रा यांनी ज्येष्ठ भाजप नेत्यांबाबत केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आहेत असं स्पष्टीकरण भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिलं. पक्षाबाबत चुकीचा संदेश पोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आणि त्यांच्याशी आपला काही संबंध नसल्याचंही गडकरींनी म्हटलं आहे. अंशुमन मिश्रा यांना भाजपने झारखंडमधून राज्यसभेची उमेदवारी दिली होती. पण वरिष्ठ भाजप नेत्यांच्या विरोधानंतर ही उमेदवारी मागे घेण्यात आली. त्यानंतर मिश्रा यांनी आयबीएन नेटवर्कच्या एका कार्यक्रमात भाजपच्या काही नेत्यांवर धक्कादायक आरोप केले होते.

close