टीम अण्णांवर कारवाई करण्याची खासदारांची मागणी

March 26, 2012 1:33 PM0 commentsViews: 3

26 मार्च

टीम अण्णांचे मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल यांनी काल जाहीर केलेल्या 14 मंत्र्यांचा मुद्दा आज संसदेत चांगलाच गाजला. जनलोकपाल कायदा आता असता तर 14 मंत्री तुरुंगात असते असं काल अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं. आणि त्यांच्याविरोधात ऑगस्टपर्यंत एफआयआर दाखल झाल्या नाही तर देशभर जेलभरो करण्याचा विचार असल्याचं अण्णांनी सांगितलं होतं. सर्वपक्षीय खासदारांनी आज अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर टीका केली आणि टीम अण्णांच्या या कृत्यावर कारवाईची मागणीही केली. सीपीआय नेते गुरुदास दासगुप्ता यांनी केजरीवाल यांना मिळणारा निधी येतो कुठून असा सवाल उपस्थित केला.

close