शिर्डी साई संस्थानाचा महाघोटाळा ?

March 26, 2012 5:03 PM0 commentsViews: 61

26 मार्च

नियमांचे उल्लंघन करणारे शिर्डी साईबाबा विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. उद्या बरखास्त करण्याची मुदत संपत आहे. दरम्यान मंडळाने एक, दोन नाही तर तब्बल 14 गैरव्यवहार केल्याचा आरोप होतोय. मंडळाने साईंच्या दर्शन घेण्यासाठी पास वाटप केले जातात यामध्ये घोटाळा केल्याचा आरोप होतं आहे. तब्बल 24 हजार पासेस बेकायदेशीरपणे विकली गेली आहे. याहीपेक्षा विशेष म्हणजे, रस्ता नाही, पालखी नाही पण 1 कोटी 12 लाखांचं बिल देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आता याबाबत हायकोर्टात आणखी एक याचिकाही दाखल करण्यात आली. शिर्डीतला महाघोटाळा

- शिर्डी साईबाबा विश्वस्त मंडळाचा महाघोटाळा- एकूण 14 गैरव्यवहारांचा आरोप- 24 हजार दर्शन पासेसची बेकायदेशीर विक्री- प्रवास खर्च घोटाळा – बनावट वाहनांच्या नावे लाखांचा प्रवास खर्च उकळल्याचा आरोप- साईबाबा हॉस्पिटल बिल घोटाळा- निकटवर्तीयांची 92 लाखांची हॉस्पिटल बिलं मंडळानं केली माफ- कोपरगाव – पालखी मार्ग घोटाळा- रस्ता नाही, पालखी नाही पण 1 कोटी 12 लाखांचं बिल दिलं- गाळे विक्रीत कोट्यवधींचा घोटाळा- 14 गैरव्यवहारांविरोधात संजय काळेंची हायकोर्टात याचिकासाई संस्थानची संपत्ती – एकूण गुंतवणूक – 529 कोटी- एफ.डी.(राष्ट्रीयकृत बँका) – 466 कोटी- किसान विकासपत्र – 40.84 कोटी- सरकारी बाँड – 22 कोटी- सोनं आणि चांदी – 28 कोटी- मौल्यवान खडे – 4 कोटी

close