गिडवानींच्या सीबीआय कोठडीत वाढ

March 26, 2012 5:26 PM0 commentsViews: 3

26 मार्च

आदर्श सोसायटी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या कन्हैयालाल गिडवानी यांच्या सीबीआयकोठडीत 27 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आदर्शमध्ये गिडवानींचे 4 बेनामी फ्लॅट असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. या अगोदर गिडवानी यांना लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र कोर्टाने जामीन देताच सीबीआयने पुन्हा गिडवानींना अटक करण्यात आली होती. आज गिडवानींना कोर्टासमोर हजर केले असता सीबीआय कोठडीत 27 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली.

close