टीम अण्णांविरोधात हक्कभंग नोटीस ?

March 27, 2012 11:50 AM0 commentsViews: 1

27 मार्चटीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी खासदारांविरोधात केलेल्या वक्तव्यावर संसदेत दुसर्‍या दिवशीही गदारोळ सुरू आहे. टीम अण्णांच्या वक्तव्यावर विरोधकांनी संसदेत चर्चा करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार लोकसभेत या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. काँग्रेसच्या खासदार जगदंबिका पाल यांनी टीम अण्णांविरोधात हक्कभंगाची नोटीस बजावण्याची मागणी केली. तर काँग्रेसचे खासदार वीरभद्र सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. रविवारी दिल्लीत जंतरमंतर येथे अण्णा हजारे यांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण झाले यावेळी जनलोकपाल कायदा असता तर 14 विद्यमान केंद्रीय मंत्री तुरुंगात असते असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं.

close