देशाची सुरक्षा धोक्यात – लष्करप्रमुख

March 28, 2012 9:18 AM0 commentsViews: 2

28 मार्च

भारतीय लष्कराकडे सध्या दारुगोळा कमी आहे आणि परकीय आक्रमणाला सामोरं जाण्यासाठी लष्कर सुसज्ज नसल्याचं पत्र लष्करप्रमुख जनरल व्हि के सिंग यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लिहले आहे. लष्कराप्रमाणेच हवाई दलाकडेही पुरेशी यंत्रणा नाही आणि त्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते असंही त्यांनी पत्रात म्हटलंय. तसेच पंतप्रधानांनी या प्रकरणाची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली. लष्करप्रमुखांनी केलेल्या लाच दिल्याच्या गौप्यस्फोटानंतर संसदेत गदारोळ सुरु झाला होता.

काल या मुद्द्यावर संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. पण आज पुन्हा याचमुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले. आणि त्यानंतर त्यांनी सरकारनं स्पष्टीकरण द्यावं ही मागणी केली. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर राज्यसभेत संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी सरकारतर्फे उत्तर दिलंय. लष्कराला सक्षम करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी अनेक बदल केले जातायत असं ए के अँटोनी यांनी राज्यसभेत उत्तर देताना स्पष्ट केलंय. लष्करप्रमुखांनी पंतप्रधानांना 12 मार्चला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी लष्कराची सध्याची परिस्थिती आणि लष्करासमोरच्या समस्या मांडल्यात.

close