लाच घेणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

March 27, 2012 10:03 AM0 commentsViews: 6

27 मार्च

पुण्यातील रामवाडी पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रंतिबंधक विभागाने लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. जगन्नाथ भाऊसाहेब शेवाळे असं लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. जगन्नाथ शेवाळेंनी लॉकपमध्ये न ठेवण्यासाठी 25 हजार रूपयंाची डेव्हीड या व्यक्तिकडून लाच मागितली होती. डेव्हीडने 25 हजार रूपयाची लाच शेवाळेंना दिली होती पण त्यानंतरही शेवाळेंनी आणखी 25 हजार रूपयांची मागणी केली होती. यामुळेच डेव्हीडच्या पत्नीने शेवाळेंची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. न्यायालयाने जगन्नाथ शेवाळेंना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

close