नगरजवळ तेलगळतीमुळे ‘पेट्रोलच्या विहिरी’

March 27, 2012 10:24 AM0 commentsViews: 33

27 मार्च

देशात पेट्रोल दरवाढीची टांगती तलवार कायम सर्वसामान्यावर लटकत असते. पेट्रोल साठा वाचवण्यासाठी देशभर प्रयत्न केले जात आहे पण अहमदनगरजवळ असलेल्या इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियमच्या डेेपोमधून खोल जमिनीत तेल गळती होत असल्याची धक्कादायक बाब स्पष्ट झाली आहे. आणि हे पेट्रोल शेजारील विहिरीत जाऊन मिळाले आहे.

अहमदनगरपासून 15 किमी अंतरावर अकोळनेर गावात हा डेपो आहे. पेट्रोल गळती होऊन आसपासच्या शेतकर्‍यांच्या विहिरीत पेट्रोल मिसळले आहेत. पेट्रोल मिशि्रत पाणी न पिण्यासाठी वापरता येईना आणि जनावरांनाही देता येईना यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. ही तेलगळती मागील 4 वर्षांपासून सुरु आहे. मात्र सुरूवातील झालेली तेलगळती थोड्याप्रमाणावर होती त्यामुळे शेतकर्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र आता या तेलगळतीमुळे 'पेट्रोलच्या विहिरी' झाल्या आहे. आज शेतकर्‍यांनी पेट्रोल मिशि्रत पाणीच जिल्हाधिकार्‍यांनी आणून दाखवले. लवकरात लवकर सरकारने कारवाई करावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

close