दुष्काळग्रस्त भागात कर्जवसुली थांबवण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

March 28, 2012 9:35 AM0 commentsViews: 1

28 मार्च

50 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांमधील सक्तीची कर्जवसुली थांबवण्यात आल्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केला. यामध्ये रोजगार हमी योजनेच्या मजुरीचा दर वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे यापुढे मजुरांना 145 रुपये मिळणार आहेत. तर 10 जनावर असणार्‍यांना चार्‍यासाठी 90 टक्के अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर मागणी तिथं चारा डेपो देण्याचाही निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. दुष्काळाच्या मुद्यावर काल मंगळवारी दिवसभर अधिवेशनात चर्चा झाली. यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज उत्तर दिलंय.

close