गोव्यात पेट्रोल 11 रुपयांनी स्वस्त होणार

March 27, 2012 10:35 AM0 commentsViews: 1

27 मार्च

पेट्रोल स्वस्त होणे म्हणजे सर्वसामान्यांना मोठा दिलासा असतो पण हे भाग्य काही निवडक लोकांनाच मिळते. गोव्यात पेट्रोल 1 रुपये नाही, 3 रुपये नाही तर तब्बल 11 रुपयांनी स्वस्त होणार आहे गोव्याचे नवे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज राज्याच्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली. 2 एप्रिल पासून गोव्यात पेट्रोलचे दर कमी होणार आहेत. गोव्यात सध्या पेट्रोलचा दर 66 रुपये लिटर आहे. त्याच्या किंमती 55 रुपयांपर्यंत खाली आणण्याचं आश्वासन भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं. त्यामुळे तमाम गोवेकरांनी सरकारच्या निर्णयाने खुश झाले आहे.

close