आरोप खोटे असतील तर आमच्यावर कारवाई करा – अण्णा

March 28, 2012 9:52 AM0 commentsViews: 1

28 मार्च

अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे आमच्याकडे आहे संसदेनं केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी असं आव्हान अण्णा हजारेंनी सरकारला दिलं. केजरीवाल यांच्याकडे याबाबतचे पुरावे आहेत. आमचे आरोप जर खोटे ठरले तर खुशाल आमच्यावर कारवाई करा पण खासदार दोषी आढळले तर खासदारांवर कारवाई करा असं आवाहनही अण्णांनी केलं. रविवारी झालेल्या एकदिवशीय आंदोलनात अरविंद केजरीवाल यांनी 14 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला तशी यादीच केजरीवाल यांनी वाचून दाखवली. अण्णांनीही दोषी मंत्र्यांवर एफआयआर दाखल करा अन्यथा आंदोलन करू अशा इशाराही दिला.

close