पुण्यात शिवसेना आमदारांने डिव्हायडरच काढला

March 27, 2012 7:32 AM0 commentsViews: 1

27 मार्च

पुण्यात स्वारगेट हडपसर या बीआरटी मार्गावरच्या हडपसर उड्डाणपुलाजवळचा डिव्हायडरमुळे वारंवार होणारे अपघात, आणि वाहतुकीची नेहमीच होणारी कोंडी यामुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. आज शिवसेना आमदार महादेव बाबर यांनी हा डिव्हायडरच काढून टाकला आहे. बुलडोझरच्या मदतीने उड्डाणपुलाजवळचा पुर्ण डिव्हायडर काढून टाकण्यात आला आहे. यावेळी स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हे डिव्हायडर काढून टाकण्यात यावे यासाठी महापालिका प्रशासनाला वारंवार विनंती करुनही त्यांनी काहीच कारवाई न केल्याने अखेर हे पाऊल उचलावं लागलं असं समर्थन आमदार बाबर यांनी केलं आहे.

close