नक्षलवादाविरोधात लढा देण्यासाठी कायद्यात बदल गरजेची -गृहमंत्री

March 28, 2012 10:09 AM0 commentsViews: 3

28 मार्च

नक्षलचा सामना करण्यासाठी कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे आज पोलिसांना चौकटीत राहूनच काम करावं लागतं असं मत गृहमंत्री आर आर पाटील यांनी व्यक्त केलं. ते गडचिरोलीत बोलत होते. काल मंगळवारी नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला या स्फोटात 12 जवान शहीद झाले. आज गृहमंत्र्यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच गुप्तचर यंत्रणा कधीही फेल गेली नाही. याचा पूर्ण तपास केला जाईल असं गृहमंत्र्यांनी सांगितले. यावेळी जखमी जवानांची गृहमंत्र्यांनी भेट घेतली.

close