पुण्यात 3 सराईत दरोडेखोरांना अटक

March 27, 2012 7:41 AM0 commentsViews: 1

27 मार्च

पुण्यातील बिजलीनगर भागात दरोडा टाकायला निघालेल्या 3 सराईत दरोडेखोरांना पुणे गुन्हे शाखेनं अटक केली. अमोल ओव्हाळ, परवेज हानिफ शेख आणि विजय कोळी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या तिनही आरोपींनी सांगलीतील सचिन ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लुटला होता. या सर्व आरोपींकडून पोलिसांनी एक किलो 80 ग्रॅम सोनं, 7 किलो 800 ग्रॅम चांदी, 2 लाख रूपये रोख, एक मोटार सायकल, एक होंडा सिटीकार आणि घातक शस्त्र साठयासह एकूण 37 लाख 61 हजार रूपयाचा मुद्दे माल जप्त केला आहे.

close