सुवर्णगणेश मूर्ती चोरी प्रकरणी दरोडेखोरांचे फोटो जारी

March 28, 2012 10:21 AM0 commentsViews: 19

28 मार्च

दिवेआगर येथील प्राचीन सुवर्णगणपती मूर्ती चोरी प्रकरणी संशयितांचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना मिळाले आहे. मंदिराच्या सीसीटीव्हीत पाच दरोडेखोर कैद झाले आहेत. त्यातले दोन जणांचे फोटो स्पष्ट दिसत आहे. या दोन दरोडेखोरांचे फोटो राज्यात आणि राज्याबाहेर सर्व पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले आहे. या दोन चोरांना शोधण्यासाठी रायगड पोलिसांची 19 पथकं राज्यात तर 9 पथकं राज्याबाहेर तपास करत आहेत. हे दोन व्यक्ती कोठेही आढळली तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलंय. दरम्यान, उद्यापर्यंत जर मूर्ती मिळाली नाही तर उद्या रायगड बंदचं आवाहन शिवसेनेनं केलं आहे.

close