पंजाबच्या दिवगंत मुख्यमंत्र्यांच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

March 27, 2012 11:57 AM0 commentsViews: 1

27 मार्च

पंजाबचे दिवंगत मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या मारेकर्‍याला 31 मार्चला फाशी देण्याचे आदेश चंदीगड सेशन्स कोर्टाने आदेश दिले आहेत. बेअंत सिंग यांच्या हत्येप्रकरणी बलवंत सिंग राजोना याला स्पेशल सीबीआय कोर्टाने ऑगस्ट 2007 ला फाशीची शिक्षा सुनावली होती. काही दिवसांपुर्वीच पटियालाच्या तुरुंग अधिकार्‍याने ही शिक्षा काही काळ स्थगित करावी अशी याचिका सेशन्स कोर्टात दाखल केली होती. पण कोर्टाने आज ही याचिका फेटाळली आणि बलवंत सिंगला 31 मार्चला फाशी देण्यात यावी असा आदेश दिला. यापार्श्वभूमीवर पंजाबमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

close