डोन्ट वरी,सचिन आयपीएलमध्ये खेळणार !

March 28, 2012 10:39 AM0 commentsViews: 8

28 मार्चपुढच्या महिन्यात 4 एप्रिलला आयपीएल-5 ला सुरुवात होतं आहे आणि अशातच मुंबई इंडियन्सचा कॅप्टन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर टाचेला दुखापत झाल्यामुळे लंडनला गेला आहे. त्यामुळे आज दिवसभर सचिन आयपीएलच्या पाचव्या हंगामाला मुकणार अशा चर्चेला उधाण आले होते.. सचिनच्या टाचेला दुखापत झाली. आणि टाचेच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी सचिन लंडनला गेला आहे. लंडनला तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय घेण्यात येणार आहे. बीसीसीआयनंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण सचिन आयपीएलमध्ये खेळणार असल्याचा दावा मुंबई इंडियन्सने केला आहे. तो दोन दिवसात मायदेशी परतणार असल्याचं मुंबई इंडियन्सकडून सांगण्यात आलंय.

close