नाशिकमध्ये भीषण आगीत 3 गोडाऊन, 20 घरं खाक

March 28, 2012 10:45 AM0 commentsViews: 2

28 मार्च

नाशिक जिल्ह्यातील वडाळा गावात आज सकाळी लागलेल्या आगीत 3 गोडाऊन आणि 20 घरं जळून खाक झाली आहेत. ही आग आटोक्यात आणण्यासााठी अग्निशमन दलाचे शर्थीने प्रयत्न सुरू आहे. मात्र या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण आगीचं स्वरूप मोठं असल्यामुळे अग्निशमन दलाला अडचणी येत आहे. त्यातच हा भाग दाट वस्तीचा असल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केलं आहे. गेल्या वर्षी ही याच ठिकाणी मोठी आग लागली होती. तरीही या ठिकाणची अनधिकृत गोडाऊन हलवण्यात येत नसल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला.

close