संसदेत टीम अण्णांचा एकमुखाने निषेध

March 27, 2012 1:53 PM0 commentsViews: 4

27 मार्च

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या टीम अण्णांला संसदेनं चांगलेच फटकारले. आज केंद्रीय मंत्री आणि संसद सदस्यांवर जहरी टीका करणार्‍या टीम अण्णांचा आज संसदेत एकमुखाने निषेध करण्यात आला. संयुक्त जनता दलाचे खासदार शरद यादव यांनी आज संसदेत टीम अण्णांच्या निषेधाचा ठराव मांडला. या ठरावाला सर्वपक्षीय खासदारांनी एकमुखाने पाठिंबा देत ठराव मंजूर केला. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी संसदेत येतात. त्यामुळे संसदेसारख्या सर्वोच्च संस्थेच्या मान आणि प्रतिमेला धक्का पोचवणारी टीका अनुचित आणि अस्विकारार्ह आहे, अशा शब्दात लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी टीम अण्णाला समज दिली.

लोकपाल विधेयकासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि त्यांची टीम मैदानात उतरली. आपण निवडुन दिलेले खासदार हे जनतेचे सेवक आहे त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजेच असं सांगत नेहमी हल्लाबोल केला. रविवारी दिल्लीत झालेल्या एकदिवसीय आंदोलनात टीम अण्णांचे मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल यांनी 14 मंत्र्यांना भ्रष्टाचारी म्हणत त्यांच्या आरोपाची यादीच जाहीर केली. जर लोकपाल विधेयक कायदा असता तर हे मंत्री तुरुंगात असते असंही केजरीवाल म्हणाले. तर संयुक्त जनता दलाचे खासदार शरद यादव गंभीर टीका केली. केजरीवाल यांच्या या यादीत पि.चिदंबरम,कपिल सिब्बल,शरद पवार, विलासराव देशमुख या केंद्रीय मंत्र्यांवर आरोप केले.

अण्णांनीही केजरीवाल यांच्या आरोपाचा धागा पकडत येत्या ऑगस्टपर्यंत दोषी मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा अन्यथा देशभर जेलभरो आंदोलन करू असा इशारा दिला. टीम अण्णांच्या या बेफाम आरोपामुळे व्यथीत झालेल्या संयुक्त जनता दलाचे खासदार शरद यादव यांनी आज संसदेत टीम अण्णांच्या निषेधाचा ठराव मांडला.आज आंदोलन करण्यांचा सर्वांना अधिकार आहे पण संसदेवर आरोप करणे चुकीचे आहे त्यामुळे टीम अण्णांवर कठोर कारवाई करा अशी मागणी यादव यांनी केली तर या ठरावाला सर्वपक्षीय खासदारांनी एकमुखाने पाठिंबा देत ठराव मंजूर केला. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी संसदेत येतात. त्यामुळे संसदेसारख्या सर्वोच्च संस्थेच्या मान आणि प्रतिमेला धक्का पोचवणारी टीका अनुचित आणि अस्विकारार्ह आहे, अशा शब्दात लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी टीम अण्णाला समज दिली.

close