नव्या साई संस्थान मंडळात जुने सदस्य घुसले ‘रांगेत’

March 28, 2012 11:06 AM0 commentsViews: 9

28 मार्च

शिर्डी येथील साई संस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त करुन नवं मंडळ स्थापन करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने नविन विश्वस्त मंडळ स्थापन केलं आहे. मात्र त्यात जुन्याच सदस्यांचा समावेश केला गेला. शिवाय औरंगाबाद खंडपीठाने जे आदेश दिले होते याचिकाकर्त्यांनी जी मागणी केली होती तीच मागणी राज्यसरकारनी पुर्ण केली नाही, त्यामुळे राज्य सरकारनी कायद्याचा अवमान केला आहे असं मत याचिकाकर्त्यांचे वकिल सतिश तळेकर यंानी व्यक्त केलंय. शिवाय आता नव्या मंडळाच्या निवडीला दोन दिवसामध्ये आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात येणार असल्याचही त्यांनी सांगितले.

शिर्डी संस्थानची नवी विश्वस्त समिती

- जयंत ससाणे – अध्यक्ष (काँग्रेसचे माजी आमदार)- घनश्याम शेलार – उपाध्यक्ष (राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष)- राधाकृष्ण विखे पाटील – सदस्य (काँग्रेसचे मंत्री)- विलास कोते – सदस्य (विखेंचे कार्यकर्ते)- डॉ.प्रकाश चांदूरकर – सदस्य – डॉ.नामदेव गुंजाळ – सदस्य (थोरातांचे कार्यकर्ते)- शैलेश कुटे – सदस्य (काँग्रेस, माजी शहराध्यक्ष)- डॉ.राजेंद्र पिपाडा – सदस्य (राष्ट्रवादीचे सरचिटणीस)- ऍड.सुरेंद्र खर्डे – सदस्य (राष्ट्रवादीचे माजी सरपंच)- स्नेहलता कोल्हे – महिला सदस्य (शंकररावांच्या सूनबाई)- पतिंगराव शेळके – सदस्य (राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य) – मीनानाथ पांडे – सदस्य (अगस्थी कारखान्याचे संचालक)- अजित कदम – सदस्य – सुरेश वाधवा – सदस्य

close