अकोल्यात 2 संशयित अतिरेक्यांना अटक

March 27, 2012 2:30 PM0 commentsViews: 6

27 मार्च

सोमवारी औरंगाबादमध्ये एटीएस आणि सीमीच्या दहशतवाद्यांच्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. आज अकोल्यामध्ये एटीएसने दोन संशयित अतिरेक्यांना अटक केली. बुलडाणा जिल्ह्यातल्या सैलानी यात्रेत हे दोघे फिरत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. दहशतवादी संघटनांशी संबंधीत अतिरेकी या यात्रेत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचुन या दोघांना ताब्यात घेतले. अकिल मोहम्मद खल्जी आणि मोहम्द जफर हुसेन अशी पकडण्यात आलेल्या या दोघांची नावं असून त्यांना चौकशीसाठी अकोल्यात आणण्यात आलंय.

close