हर्षवर्धन जाधव यांना जीवे मारण्याची धमकी

March 28, 2012 11:16 AM0 commentsViews: 32

28 मार्च

औरंगाबादचे मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार केली आहे. याबद्दल क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून जाधव यांनी सुरक्षेची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर औरंगाबाद मनसेमध्ये उघडउघड फुट पडली होती. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मनसेनं युतीला पाठिंबा न देता आघाडीला पाठिंबा दिला होता तर हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या दोन सदस्यांना युतीला मतदान करायला सांगितले होते. तेव्हापासून या वादाला तोंड फुटले आहे.

close